Breaking News

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ‘रामप्रहर’ला भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कामांची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहचवण्यासाठी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी (दि. 21) ‘रामप्रहर’ कार्यालयाला भेट दिली. पंतप्रधानांच्या कामांची तंतोतंत माहिती संकलित केलेले पुस्तक या वेळी उपाध्ये यांनी मुख्य संपादक देवदास मटाले यांना दिले. या वेळी भाजपचे कोकण विभाग प्रमुख सागर भदे, ‘रामप्रहर’चे व्यवस्थापक दादाराम मिसाळ, मल्हार टिव्हीचे संपादक नितीन कोळी उपस्थित होते. महाजनसंपर्क अभियानांतर्गत राज्यातील दीड कोटी लोकांशी संपर्क साधण्यात येणार आहे. नऊ वर्षांतील कामांचा समाजातील कोण कोणत्या स्तराला किती लाभ झाला आणि शासनाचे सुशासनात कसे रूपांतर झाले याची माहितीही संबंधितांनी देण्यात येणार आहे. भाजपने केलेल्या कामांची पूर्ण माहिती अनेकदा प्रसार माध्यमांकडेही नसते. तसेच कामांची आकडेवारीही अर्धवट असते. या वेळी सदर पुस्तकातील माहिती आणि आकडेवारीचा उपयोग लिखाण करणार्‍या व्यक्तीला होऊ शकतो.
राज्यातील राजकारण आणि भाजपची भूमिका यावर या बैठकीत चर्चा झाली. मल्हार टिव्हीचे संपादक नितीन कोळी या वेळी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply