Breaking News

सीकेटी महाविद्यालयात योग दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त) महाविद्यालयात बुधवारी (दि.21) आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स, शारीरिक शिक्षण आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे योग सत्राचे आयोजन करण्यात आले.
या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंग च्या प्रतिनिधींनी महाविद्यालयातील एन.सी.सी. कॅडेट, एनएसएस स्वयंसेवक, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गास योगाभ्यासाचे प्रशिक्षण प्रदान केले. योगा सत्राची सुरवात ध्यानसाधनेने झाली, यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या चमुने प्रशिक्षणार्थींशी हितगुज करीत योगासनांचे महत्त्व विषद करून निरोगी आयुष्यासाठी योगाभ्यास आवश्यक असल्याचे भाष्य केले. त्यानंतर योगा प्रशिक्षकांच्या निरीक्षण तथा मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी मानेचा, खांद्याचा, कमरेचा आदी सहज-योगाभ्यास केला.
योगसत्रात विविध आसनांचा सराव करून घेतला. श्वसन क्रियेशी संबंधित अनुलोम-विलोम, प्राणायाम, आणि कपालभारतीचा सराव करण्यात आला. व शवासनाने योगासनांची सांगता करण्यात आली.
महाविद्यालयाच्या एन.सी.सी. तथा रोट्रॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या उद्याणात योगसत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले या वेळी एनसीसी कॅडेट्स यांनी योगाभ्यास करत निरोगी आरोग्य जपण्याचा संदेश दिला. या वेळी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, कला शाखाप्रमुख प्रो. डॉ. बी. एस. पाटील, वाणिज्य शाखा प्रमुख प्रो. डॉ. एस. बी. यादव, विज्ञानशाखा प्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर, विविध विभागांचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी. विभागाचे प्रमुख कॅप्टन डॉ. यु. टी. भंडारे, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. विनोद नाईक, प्रा. अनिल नाकती, प्रा. अजिंक्य भगत, डी. एल.एल.ई. विभागाचे प्रमुख प्रो. बी. एस. पाटील, विस्तार शिक्षक प्रा. हरिभाऊ खरात, प्रा. अतुल घाडगे यांनी विशेष
परिश्रम घेतले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply