श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे खारघरमधील ओवेपेठ येथील जि. प. शाळेत वह्यावाटप व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयात वह्यांसोबत दप्तरांचे वाटप करण्यात आले.
भाजपचे तालुका अध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 22) हा उपक्रम राबविण्यात आला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी वह्या तसेच इतर शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार ओवेपेठ येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका संघटक प्रभाकर जोशी, खारघर तळोजा सचिव सचिन वासकर, खारघर तळोजा कामगार सेना अध्यक्ष जयदास तेलवणे, खारघर तळोजा अल्पसंख्यांक अध्यक्ष इरशाद शेख, मोतिराम जोशी, सुजाता जोशी, आदी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. अरुणशेठ भगत यांनी दहावीच्या 100 टक्के निकालाबद्दल अभिनंदन केले. सुत्रसंचलन श्री. खांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीनी पुजा राठोड हिने केले. तर प्रास्ताविक श्री. जोगदंडे यांनी व आभार श्री. जाधव यांनी मानले.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …