मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा चाललेला गलथान कारभार व त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश व नोकरभरतीबाबत नुकसान होत असल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर आक्रोश व्यक्त करण्यासाठी, आरक्षण व इतर मागण्यांची सद्यस्थिती यावर चर्चा करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती महामुंबईतर्फे रविवारी (दि. 1) संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही संघर्ष यात्रा ही सकाळी लालबागपासून सुरू होणार असून व तिची सांगता संध्याकाळी ठाणे येथे होईल. दुसरीकडे ओबीसींकडून 3 नोव्हेंबरपासून राज्यभरात ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन करण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यभरातील सर्व तहसीलदार कार्यालयांना निवेदनदेखील दिले जाणार आहे.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …