Breaking News

महाजनसंपर्क अभियानांतर्गत भाजप वैद्यकीय प्रकोष्ठची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त

मोदी ऽ 9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत रायगड उत्तर जिल्हा वैद्यकीय प्रकोष्ठच्या वतीने प्रवास योजना अंतर्गत रविवारी येथे बैठक झाली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश सह संयोजक डॉ. योगेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

या वेळी बोलताना प्रमुख मार्गदर्शक डॉ. योगेश पाटील यांनी, सर्व पदाधिकार्‍यांच्या विचारलेल्या अनेक प्रश्नांना सकारात्मक उत्तरे देवून वरिष्ठ स्तरावरती चर्चा करुन योग्य मार्ग काढण्यात येईल असे आश्वस्थ केले.  पुढे बोलताना मा. पंतप्रधान नरेन्द्र मोदींजीनी मागील नऊ वर्षाच्या काळात भारत देश विश्वगुरू बनविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेवुन भारत मजबूत देश घडवत आहेत. कार्यक्षम पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वातील सरकारला 9 वर्ष पुर्ण झाले आहे. त्या अनुषंगाने मोदी ऽ 9 महासंपर्क अभियान अंतर्गत  सेलिब्रेशन ऐवजी नागरिकांशी कम्युनिकेशन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मागील 9 वर्षांत आपण अतिशय गतिमान सरकार पहिले, प्रचंड विकासात्मक कामे आपण पहिली. विविध योजनेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला मदत करून विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त कारभार देशातील जनतेने पाहिला. त्याची फलश्रुती म्हणून भारताची प्रतिमा जगात उंचावत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गरीब कल्याणाचे विविध आयाम तयार करून त्यांचे अधिकार पोहचविण्याचे काम केले गावा,शहराची देशात आणि देशाची जगात एक वेगळी ओळख मागील नऊ वर्षात माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात झाली आहे, असे मत व्यक्त केले. रायगड जिल्हा संयोजक डॉ. बबन नागरगोजे यांनी प्रास्ताविकात उत्तर रायगड वैद्यकीय सेलच्या वतीने करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. पनवेल महानगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती डॉ.अरुणकुमार भगत यांनी, बायो वेस्ट गोळा करणार्‍या कंपनी कचरा उचलताना कायद्यावर बोट ठेवून कशा प्रकारचा त्रास देऊन डॉक्टरांची पिळवणूक करतात,तसेच बॉम्बे नर्सिंग ऍक्टचे नियम हॉस्पिटल साठी कशा प्रकारे जाचक ठरतात,त्याच्यामध्ये कशी सुधारणा करावी आणि ह्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवण्यास डॉ.पाटील यांनी एक प्रवासीदूत म्हणून मदत करुन डॉक्टरांचे प्रश्न मार्गी लावावे, असे मत व्यक्त केले.

या वेळी जिल्हा सहसंयोजक डॉ. अनिल पराडकर, पनवेल ग्रामीण संयोजक डॉ. संतोष आगलावे, पनवेल शहर संयोजक ज्योती देशमाने,  कामोठे संयोजक डॉ.विजय पाटील, खोपोली संयोजक डॉ. चंदनशिवे, खालापूर संयोजक डॉ.मिश्रा यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. सहसंयोजक डॉ.कृष्णा देसाई यांनी, सर्वांचे आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या विविध लोकोपयोगी योजना देशातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्या आम्ही सर्व कटीबद्द आहोत, अशी ग्वाही दिली.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply