कामोठे : रामप्रहर वृत्त
प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते दि. बा .पाटील साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कामोठे विद्यालयाचे नामकरण लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय कामोठे असे करण्यात आले.
विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटी मार्फत न्यू इंग्लिश स्कूल कामोठे विद्यालयाचे नाव बदलण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावाला रयत शिक्षण संस्थेची मंजूर मिळाली. दिवंगत दि. बा. पाटीलसाहेब यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून विद्यालयाचे चेअरमन जयदास गोवारी, व्हा. चेअरमन विनायक म्हात्रे, चेअरमन बाळाराम चिपळेकर, माजी चेअरमन तथा शिक्षणप्रेमी स्वामी म्हात्रे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य विश्वनाथ गोवारी, विनोद गोवारी, मुख्याध्यापक, सर्व सेवकवृंद, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय कामोठे या विद्यालयाचा नामकरण सोहळा झाला.
रायगड जिल्ह्यातील, नवी मुंबईमधील शेतकरी-कष्टकर्यांसाठी सारे आयुष्य झिजवणार्या दि. बा. पाटील यांचे नाव रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कामोठे विद्यालयाला देण्याची मागणी होत होती. त्यानुसार ‘दिबां’च्या स्मृतीदिनी शाळेला त्यांचे नाव देण्यात आले.