आमदार महेश बालदी यांची उपस्थिती
उरण : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उरण येथील द्रोणागिरी इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन ‘रयत’चे मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 5) करण्यात आले. या वेळी पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमही झाला.
करंजा मच्छीमार सोसायटीप्रणित द्रोणागिरी विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शाह, करंजा मच्छीमार सोसायटी चेअरमन प्रदीप नाखवा, व्हाईस चेअरमन राजेंद्र नाखवा, सीताराम नाखवा, रमेश नाखवा, नितीन कोळी, शिवदास नाखवा, नारायण नाखवा, विद्यालय चेअरमन दीक्षिता कोळी, जनरल मॅनेजर भावना आठवले, सोनाली कोळी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, मी स्वतः रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे तसेच या शाळेबरोबर माझे 1993पासूनचे संबंध आहेत. आपल्या समाजाचे ऋण फेडले पाहिजेत यासाठी मी काही ना काही मदत करीत असतो. शैक्षणिक क्षेत्रात सातारा आणि मोखाडा येथे स्वखर्चाने बांधून दिलेल्या इमारतींचा उल्लेख त्यांनी केला व हे सर्व माझ्यासाठी नाही, तर समाजासाठी केले आहे, असे सांगितले.
आमदार महेश बालदी यांनीही विद्यालयाला आर्थिक किंवा वस्तूरूपात जी काही मदत लागेल ती देण्याचे आश्वासन दिले.
या वेळी दहावीत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.