Breaking News

शिक्षक, अंगणवाडी सेविकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका

उरण : वार्ताहर

उरणमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यास सांगितले आहे, पण या टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या बोकडवीरा येथील कोविड केअर सेंटर येथे करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षक, कर्मचारी व अंगणवाडी सेविकांनाही कोविड संसर्ग होण्याची शक्यता आहे. या कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली असून आमच्या जिवाशी मांडलेला खेळ थांबवून टेस्ट एखाद्या त्रयस्थ ठिकाणी करण्याची मागणी केली आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी शिक्षकांना बोकडवीरा येथील कोविड केअर सेंटर येथे बोलविण्यात येते, जेथे अगोदरच कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे आधीच भीतीखाली वावरणार्‍या कर्मचार्‍यांना टेस्ट निगेटिव्ह आली तरी एखादा कोरोना विषाणू आपल्या संपर्कात तर आला नाही याची चिंता वाटू लागली आहे.त्यात आणखी भर म्हणजे जे सामान्य नागरिक आजारी असून त्यांना कोरोनाची लागण झाली असेल या संशयावरुन कोरोना टेस्ट करायला सांगितली आहे तेही त्याच रांगेत उभे आहेत. त्यामुळे राज्य शासनाला कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणायची आहे की निरोगी नागरिकांना कोरोना टेस्टच्या नावे कोरोनाग्रस्त करायचे आहेत हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिक्षकांना चौथ्यांदा आरटी-पीसीआर टेस्ट करण्यासाठी बोकडवीरा कोविड सेंटर येथे बोलविले आहे, जिथे अगोदरच कोरोना रुग्ण आसलेल्या वॉर्डच्या बाजूला रांगा लावल्या आहेत.तिथे इतर आजारी लोकही टेस्ट करण्यासाठी आले आहेत. खरे तर आरटी-पीसीआर किट घेऊन या टेस्ट इतरत्रही करता आल्या असत्या. -रंजना केणी, शिक्षिका

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply