Breaking News

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 24) पनवेलमध्ये घेतला. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पॅकेज 1 ते पॅकेज 10च्या कामाची सद्यस्थिती आणि प्रगतीचा तसेच पावसाळ्यात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्याचबरोबर ऐन पावसाळ्यात महामार्गावर कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करून संबंधित अधिकार्‍यांच्या टीमने पावसाळ्यात रहावे, असे निर्देश देत मुसळधार पावसामुळे या महामार्गावर जे खड्डे पडले असतील ते तातडीने बुजवून वाहनचालकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply