ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये; मान्यवरांच्या उपस्थितीत हाती घेतले ‘कमळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी (दि. 11) भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्ष अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे यांनी भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले. भाजपत प्रवेश करताना शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली. यापूर्वी जी काँग्रेस होती ती आता नाही, असे त्यांनी नमूद केले.
मी माझ्या राज्यासाठी स्वप्न पाहिले होते, मात्र ते काँग्रेसचे सरकार स्थापन होऊन 18 महिन्यांतही पूर्ण झाले नाही. शेतकर्‍यांना जी मदत मिळणार होती, तीदेखील अद्याप मिळालेली नाही. रोजगाराचे नाही, तर भ्रष्टाचाराचे उद्योग सुरू झाले आहेत, अशा आरोपांच्या फैरी झाडून मला आज जे व्यासपीठ मिळाले त्याद्वारे आम्ही जनतेची सेवा करीत पुढे जाऊ, असा विश्वास ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.
आमच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे. शिंदे यांना भाजपमध्ये मुख्य प्रवाहात काम करण्याची संधी मिळेल याचे आम्ही आश्वासन देतो, असे जे. पी. नड्डा या वेळी म्हणाले, तसेच शिंदे यांचे पक्षासाठी योगदान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मध्य प्रदेशच्या राजकारणात भूकंप आणल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे गुरुवारी भोपाळला जाऊन शुक्रवारी म्हणजे 13 मार्च रोजी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
मोदींच्या हाती देशाचे भविष्य सुरक्षित
देशाच्या इतिहासात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला जनादेश आजवर कुणालाही मिळालेला नाही. भारताचे भविष्य नरेंद्र मोदींच्या हाती सुरक्षित आहे. त्यांनी भारताचे नाव जगात पोहचवले, अशा शब्दांत ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक केले, तसेच काम करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले.

Check Also

Zimpler Casinos fifty+ Finest Casinos double tigers slot on the internet Taking Zimpler

Articles Double tigers slot: Could there be one support service to contact?: Guide away from …

Leave a Reply