आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन
कळंबोली : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांचा शुभारंभ रविवारी (दि. 6) कळंबोली येथे झाले. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, मी कळंबोलीतील सर्व नागरिकांचे, नगरसेवक, शहराध्यक्ष यांना मी धन्यवाद देतो, कारण एकाच वेळी आज जवळजवळ शंभर कोटींच्या कामांचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे, याचे सर्व श्रेय आपण केलेल्या पाठपुराव्याचे आहे.
कळंबोली शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील अंतर्गत रस्ते फुटपात आणि गणेश मंदिराच्या बाजूच्या मोकळ्या जागेचे काँक्रिटीकरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून होणार आहे, तर कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मधील सुधागड हायस्कूल ते काळभैरव मंगल कार्यालय सेक्टर 1 येथील रस्त्याचे डांबरीकरण, सुधागड स्कूल ते सत्यसंस्कार सोसायटी, सत्यसंस्कार सोसायटी ते तिरुपती सोसायटी येथील रस्त्याचे डांबरीकरण, तिरुपती सोसायटी ते शिवप्लाझा सोसायटी पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, बिकानेर स्वीट होम ते कळंबोली पोलीस स्टेशनपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, सेक्टर 1 बिकानेर स्वीट होम ते हनुमान मंदिर, हनुमान मंदिर ते सेंट जोसेफ हायस्कूल, के एल कॉलेज ते हनुमान मंदिर आणि हनुमान मंदिर ते मायेक्का मंदिर, शंकर मंदिर ते सेंट जोसेफ हायस्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल ते साई बाबा मंदिर सेक्टर 2, गणेश मंदिर समोरील पूर्ण रस्ता विठ्ठल मंदिर ते सप्तशृंगी मंदिर रस्ता अशा प्रभाग क्रमांक दहा मधील सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण भूमिपूजनाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या भूमिपूजन सोहळ्याला कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, पनवेल महापालिका माजी सभापती मोनिका महानवर, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, रामा महानवर, अशोक मोटे, प्रकाश शेलार, दिलीप बेस आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
‘तुमची-आमची अस्मिता जपणारे महायुतीचे सरकार’
तुमची-आमची अस्मिता जपणारे महायुतीचे सरकार जे तुमच्या संसाराला मदत करते, विविध योजना तुमच्यासाठी केंद्र सरकार असू द्या किंवा राज्यात महायुतीचे सरकार असू द्या, नेहमीच आपल्या बरोबर राहिले आहे. पुढल्या काळात आपणही महायुतीच्या बाजूने कौल द्याल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमावेळी व्यक्त केला.