Breaking News

कामोठे, कळंबोलीत रंगला खेळ पैठणीचा

भाजपच्या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे स्वागत केले जात आहे आणि याच महिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्वच महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने करण्यात आले होते. कळंबोली व कामोठे येथे झालेल्या कार्यक्रमाला महिलांनी मोठी उपस्थिती लावली.
कामोठ येथे झालेल्या कार्यक्रमाला गोव्याचे माजी आमदार आणि पनवेल विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक दयानंद सोपटे म्हणाले की, आमदार प्रशांत ठाकूर यांनी आरोग्याच्या संदर्भात असो किंवा शैक्षणिक, शिक्षणासंदर्भात असो मदतीचा हात सदैव देत असतात अशा माणसाच्या पाठीमागे आपण सर्वांनी ठामपणे उभा राहण्याची गरज आहे.
कामोठे सुषमा पाटील विद्यालयाच्या भव्य मैदानावर झालेल्या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, गोव्याचे माजी आमदार आणि पनवेल विधानसभा निरीक्षक दयानंद सोपटे, कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी, माजी महापौर कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, कामोठे संपर्कप्रमुख प्रकाश बिनेदार, महिला सरचिटणीस संध्या शारबिंदे, सरचिटणीस हर्षवर्धन पाटील,माजी नगरसेविका राजश्री वाडेकर, माजी नगरसेवक विकास घरत, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, गोपीनाथ भगत, प्रदीप भगत, डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, पुष्पा कुत्तरवडे, हॅप्पी सिंग विद्या तामखेडे, महिला मोर्चा अध्यक्ष वनीता पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, मयूर मोहिते आदी उपस्थित होते.
कळंबोली येथे झालेल्या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी ठरलेल्या महिला बहिणींचे अभिनंदन आणि त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, गोव्याचे माजी आमदार पनवेल विधानसभा प्रभारी दयानंद सोपटे, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह येथे परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, शहराध्यक्ष रवीनाथ पाटील, जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिंद्रे, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, मोनिका महानवर, प्रमिला पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, अशोक मोटेयांच्यासह महिला बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांचा तुम्ही महिला बहिणी लाभ घेत आहात. अजूनसुद्धा जर काही महीलांना या योजनेचा लाभ मिळत नसेल किंवा या योजनेसंदर्भात काही अडचणी असतील तर भारतीय जनता पक्षाच्या आपल्या विभागाच्या कार्यकर्त्यांना भेटून या समस्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू
-आमदार प्रशांत ठाकूर

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply