Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून चौकमध्ये विकासकामांचा शुभारंभ

चौक, मोहोपाडा : प्रतिनिधी
उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने स्थानिक विकास निधीतून व राज्य सरकारच्या विविध योजनांद्वारे मंजूर निधितील विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश बालदि यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रविवारी (दि.6) चौक ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आला.
चौक बाजारपेठ अंतर्गत रस्ता व गटारे बांधणे एक कोटी दहा लाख, चौक गावातील तलाव सुशोभिकरण करण्यासाठी तीन कोटी रुपये, चौक येथे सामाजिक सभागृह बांधकाम करण्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून देण्यात आली आहे. चौक ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी तीस लाख रुपये, चौक नवीन वसाहत बौद्धवाडा येथे सामाजिक सभामंडप उभारण्यासाठी 50 लाख तर तेथील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करण्यासाठी 20 लाख रुपये ची तरतुद करण्यात आली आहे. चौक नानिवली येथे सभामंडप साठी 40 लाख रुपये तर अंतर्गत रस्ते यांच्यासाठी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नम्राची वाडी या आदिवासी वाडीत अंतर्गत रस्ते यांच्यासाठी 20 लाख खर्च देण्यात आला आहे, ब्ल्यू व्हेल या नवीन घरकुल सोसायटीत जाणार्‍या रस्त्यावर 30 लाख रुपये देण्यात आले आहेत.
ग्रुप ग्रामपंचायत चौक कडे जाणार्‍या रस्त्यावर ग्रुप ग्रामपंचायत चौक व ग्रूप ग्रामपंचायत तुपगाव यांची कार्यालये आहेत. शिवाय याच मार्गावर चौक, तुपगाव, लोधीवली तलाठी कार्यालय व चौक मंडळ अधिकारी यांचेही कार्यालय आहे. चौक ग्रामीण रुग्णालय देखील याच मार्गावर असून पशु वैद्यकीय दवाखाना आणि नागरी वस्ती बरोबर यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय व नेताजी पालकर विद्या मंदिर चौक हि शाळा आहे, या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती.
या बाबत चौक सरपंच रितू ठोंबरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आमदार महेश बालदी यांनी त्याला मंजूरी दिल्याने त्यांचे आभार सरपंच रितू ठोंबरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास सरपंच रितू ठोंबरे, रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, भारतीय आर पी आय तालुका अध्यक्ष महेन्द्र धनगावकर, चौक चे उद्योगपती आणि भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद भोईर आणि अवधूत करमरकर, तुलसीदास डोंगरे, माजी अध्यक्ष रामदास ठोंबरे, चौक शहर अध्यक्ष गणेश कदम, अशोक पटेल, सागर ओसवाल, मनोहर पटेल, दर्शन पोळेकर, चौक उपसरपंच सुभाष पवार, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply