Breaking News

युवाशक्तीची मते निर्णायक ठरणार

पेण विधानसभा मतदारसंघात 18 ते 39 वयोगटात 1 लाख 30 हजार 810 मतदार

पेण : अनिस मनियार

रायगड लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना विजयाची निर्णायक आघाडी मिळवुन देणारा विधानसभा मतदारसंघ म्हणून पेणचा उल्लेख केला जातो.

पेण विधानसभा मतदारसंघात 1 लाख 30 हजार 810 युवा मतदार असून, या युवाशक्तीचे प्रत्येक निवडणुकीत 100 टक्के मतदान होते. त्यामुळे युती व आघाडयांच्या उमेदवारांना आपल्या बाजूस हे मतदान वळवण्यासाठी येत्या 12 दिवसात प्रचंड मेहनत घ्यावी लागेल.

पेण विधानसभा मतदारसंघात एकुण 3 लाख 76 मतदार असून यामध्ये 1 लाख 51 हजार 421 पुरूष तर 1 लाख 48 हजार 655 महिला मतदार आहेत. त्यात 18 ते 39 वयोगटातील युवा मतदारांची संख्या 1 लाख 30 हजार 810 घरात आहे.

पेण विधानसभा मतदार संघात 48 टक्के महिला मतदार आहेत. महिला वर्ग नेहमी प्रामाणिक व कसोशीने मतदान करतो. पेणमधील महिला मतदारांचे मतदान ज्याला पडेल तो उमेदवार काही अंशी भाग्यवान ठरणार आहे.

पेण विधानसभा मतदारसंघात 375 मतदान केंद्र असून, यामध्ये पेण तालुक्यातील 208, पाली-सुधागड तालुक्यामधील 80, तर रोहा तालुक्यातील 87 केंद्रांचा समावेश आहे.

Check Also

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply