पनवेल : रामप्रहर वृत्त
कोकण दर्पणच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कोकण दर्पणचा 14 वर्धापन दिन आयोजीत करण्यात आला होता. हा सोहळा शनिवारी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजीत करण्यात आला होता. वर्धापन दिनाचे औचित्यसाधून राज्य स्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा उपस्थित मान्यवरांच्याहस्ते नागरी सत्कार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही पुरस्कार देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, चिटणीस ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, किरण पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …