Breaking News

आमदार जयंत पाटील यांच्या निषेधार्थ रायगडातील पत्रकारांचा उद्या मोर्चा

अलिबाग ः प्रतिनिधी

अलिबाग येथील ‘लोकसत्ता’चे पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकापचे आमदार जयंत पाटील आणि आमदार पंडित पाटील यांनी लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांकडून सोमवारी (दि. 27) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

सोमवारी सकाळी 10.30 वाजता पत्रकार भवन, समुद्र किनारा, अलिबाग येथून हा मोर्चा निघेल. पोस्ट ऑफिस-काँग्रेस भवन-स्टेट बँक-कोएसो शाळा-न्यायालय-पोलीस ठाणे यामार्गे मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल.

आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील तसेच त्यांच्या साथीदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या वेळी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात येणार आहे. या मागणीचे निवेदन पत्रकारांच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देऊन मोर्चाचा समारोप होईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी या मोर्चात सहभागी होत आपल्या एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply