Breaking News

आईचे आशीर्वाद घेण्यासाठी मोदी आज गुजरातमध्ये

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीत 303 जागा मिळवत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळवले, तर एनडीएला 350पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. या अभूतपूर्व विजयानंतर आईचे आशीर्वाद घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातमध्ये जाणार आहेत. गुजरातमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आईची भेट घेतील. आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर परवा म्हणजे सोमवारी मी काशी येथे जाऊन सगळ्या मतदारांचे आभार मानणार आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आपल्या ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासूनच विरोधकांनी विविध गोष्टी समोर आणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. बेरोजगारी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, 15 लाखांचे आश्वासन, नोटाबंदीचा निर्णय, जीएसटी, राफेल करार या सगळ्या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न विरोधकांनी केला होता, मात्र त्या प्रयत्नांचा तसूभरही परिणाम लोकसभा निवडणुकीवर झालेला

दिसला नाही.

देशातील मतदारांनी 2014पेक्षाही जास्त विक्रमी मतांनी पुन्हा एकदा मोदींना आणि भाजपलाच सत्ता दिली. या अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातमध्ये जाणार आहेत. तिथे आईची भेट आणि आशीर्वाद घेतल्यानंतर सोमवारी सकाळी ते काशीला जाऊन तेथील मतदारांचे आभार मानणार आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply