
मुरूड : प्रतिनिधी
वादळ व परतीच्या पावसाने मुरूड तालुक्यात झालेल्या भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तालुका दंडाधिकारी व कृषी अधिकारी कार्यालयांतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार नुकसान भरपाई देण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यातील 24 लाख 24 हजार रूपयांचा पाहिला हप्ता शासनाकडून प्राप्त झाला असून त्यातील 21 लाख 30 हजार रुपयांचे वाटप नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या थेट बॅक खात्यात करण्यात आल्याची माहिती मुरुडचे तहसिलदार गमन गावित यांनी दिली.
मुरुड तालुक्यात सामाईक खातेदार आहेत. त्यामुळे खाते उतार्यावरील नावाप्रमाणे हमीपत्र घ्यावे लागत आहे, तसेच नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा होत असल्याने व बॅक खाते क्रमांक, आईएफ़सीआय कोड आदी नोंदी इंटरनेटशी संबंधित असल्याने नुकसान भरपाईची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यास थोडा विलंब होत असल्याचे तहसिलदारांनी सांगितले.