Breaking News

दोन बसमधून झाला ‘त्या’ बॉम्बचा प्रवास

अलिबाग : प्रतिनिधी

आपट्यात बसमध्ये सापडलेल्या बॉम्बचा प्रवास हा अलिबाग ते कर्जत आणि तेथून आपटा या मार्गावरून झाला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे आता नव्याने तपास करावा लागणार आहे.

अलिबाग आगारातून बुधवारी (दि. 20) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास एमएच 14-बीटी 2724 या क्रमांकाची एसटी बस प्रवाशांना घेऊन कर्जतकडे निघाली होती. या एसटी बसमध्ये चालक गजानन जारंडे व वाहक पुजाराम मेंडके हे ड्युटीवर होते. प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस वाहतूक कोंडीमुळे रात्री पावणेनऊ वाजता कर्जत येथे पोहोचली. तेथे वाहक मेंडके हे बसमधून उतरून आपला डबा आणण्यासाठी गेले. त्यामुळे चालक गजानन जारंडे यांनी उतरताना वाहक मेंडके यांच्या सामानासह ती पिशवी त्यांची समजून घेतली.

कर्जत येथून आपटा येथे जाणार्‍या दुसर्‍या एसटी बसमध्ये (एमएच 14-बीटी 1591) चालकाने स्वतःचे व वाहकाचे सामान ठेवले. त्यानंतर 9 वाजता ही बस कर्जतवरून आपट्याकडे जाण्यासाठी निघाली. आपटा येथे आल्यानंतर चालक जारंडे याने वाहक मेंडके यांना तुझी पिशवीपण घे, असे सांगितले. तेव्हा मेंडके यांनी माझ्याकडे कोणतीही पिशवी नाही, असे सांगितले. त्यामुळे चालक जारंडे यांनी उचललेली पिशवी वाहक मेंडके यांनी तपासली असता, त्यांना त्यात बॉम्बसदृश वस्तू असल्याचे निर्दशनात आले.

पोलीस अधिकार्‍यांबरोबरच एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेकडून आता अलिबाग ते कर्जत असा शोध सुरू करण्यात आला आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply