Breaking News

‘शेकापकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न’

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका हद्दीत सत्ताधारी पक्षाने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी करण्यात येणार्‍या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला साथ देण्यासाठी प्रभाग समिती ‘ब’ अध्यक्ष किंवा सत्ताधारी नगरसेवक  हजर राहणार नाहीत, हे माहीत असतानाही आमची नावे टाकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न शेकापने केल्याचे भाजपचे प्रभाग समिती अध्यक्ष एकनाथ गायकवाड आणि नगरसेवक महादेव मधे यांनी म्हटले आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील भाजपच्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून केलेल्या कामांचे श्रेय मिळवण्यासाठी शेकापकडून पूर्वीच झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. टेंभोडे स्ट्रीट लाईटसाठी भाजपचे नगरसेवक महादेव मधे यांनी पाठपुरावा करून केलेले कामही आम्हीच केले असे दाखवण्यासाठी त्या कामाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांचे नाव शेकापकडून टाकण्यात आले होते. मला आणि नगरसेवक महादेव मधे यांना न विचारताच आमची नावे या निमंत्रण पत्रिकेत छापण्यात आली होती, असे एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.

यासंदर्भात गायकवाड आणि मधे यांनी नमूद केले की, सत्ताधारी पक्षाने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी करण्यात येणार्‍या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला साथ देण्यासाठी आम्ही हजर राहणार नाही, याची खात्री असल्यानेच त्यांनी आमची नावे पत्रिकेत छापून आमच्या कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे असे प्रकार शेकापने करू नयेत, असा निर्वाणीचा इशारा आम्ही देत आहोत.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply