Breaking News

संकष्टी चतुर्थीनिमित्त चौक गणेश मंदिरात गर्दी

उरण ः वार्ताहर

संकष्टी चतुर्थी शनिवारी (दि. 20) असल्याने उरण शहरातील गणपती चौक येथील श्री गणपती देवस्थान येथे सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. उरण शहरातील तसेच ग्रामीण भागातील भाविक गणपतीचे दर्शन घेऊनच बाजारात जातात. मंदिराची देखभाल अनेक वर्षे पौडवाल कुटुंबीय करीत आहेत. सकाळी 7 वाजता विधिवत पूजा करण्यात आली. गणपतीचे महत्त्व एवढे आहे की मंदिरात प्रत्येक संकष्टी, अंगारकी व प्रत्येक मंगळवारी भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते. दर मंगळवारी सकाळी 7.30 वाजता व सायंकाळी 7.30 वाजता महाआरती केली जाते. अंगारकी व संकष्टी दिवशी आवर्तने, भजन केले जाते व चंद्रोदय झाल्यानंतर महाआरती केली जाते. प्रत्येक संकष्टी, अंगारकी दिवशी भक्तांना पूजेसाठी लागणारे नारळ, दूर्वा, फुलांचे हार मिळावेत यासाठी मंदिराच्या समोरील बाजूस हार-फुलांची दुकाने थाटण्यात येतात. 

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply