Breaking News

बँक ऑफ इंडियाकडून हिंदी महिना साजरा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

बँक ऑफ इंडिया, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, येथे दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्या सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. सोमवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला.

विभागीय प्रमुख एम. अन्बुकमणि व समस्तल कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत माननीय गृहमंत्री अमित शाह, राजीव गौबा, मंत्रिमंडळ सचिव, भारत सरकार तथा बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय आणि मुख्यम कार्यकारी अधिकारी ए. के. दास यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आले. महिनाभरात हिंदी निबंध, हिंदी सुलेख, हिंदी टंक लेखन, बॅकिंग शब्दावली, हिंदी ई-मेल स्पर्धा घेण्यात आल्या. हिंदी स्पर्धेचे विजेत्यांना पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन सन्माानित केले. अन्बुममणि यांनी स्पर्धेच्या विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार रमेश साखरे गच्छीक, मुख्य व्यवस्थापक (राजभाषा) यांनी केले. त्यानंतर हिंदी महिना आणि हिंदी दिवसचे समाप्त घोषित करण्यात आली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply