रेवदंडा : प्रतिनिधी – मुंबई-सायन येथील गुरूनानक महाविद्यालयाचे एनएनएस युनिट आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील सराई येथील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले.
गुरूनानक कॉलेजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी श्रमदानातून 5550 वृक्ष लागवडीचा तसेच वृक्ष संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे. अलिबागचे वनअधिकारी विकास तरसे, सामाजिक कार्यकर्त्या लतिका दातार, गुरूनानक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी धनंजय चन्नाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. वनपाल जनार्दन धर्मा पाटील, अभिमन्यू गावंड, वनरक्षक संदीप दादासाहेब रक्ते, योगेश राजेंद्र पाटील, तसेच महाविद्यालयाचे आनंद मोहनरॉय, एस. के. अहाना, श्रेया भंडारी, स्वप्नील साळवी यांच्यासह 50 विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. त्यांनी या वेळी सराई डोंगरावर जांभूळ, करंज, भाया, आवळा, वेळा, साग आदी प्रकाराच्या एक हजार वृक्षरोपट्यांची लागवड केली.