उरण ः वार्ताहर
उरण तालुक्यातील केअरऑफ नेचर संस्था वेश्वीचे संस्थापक, राजू मुंबईकर यांच्या वाढदिवसानिमित्त केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या वतीने उरणमध्ये विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उरण तालुक्यातील विविध ठिकाणी हे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये पाले येथे कपडे धुण्यासाठी तळ्याला बांधलेल्या शेडचे उद्घाटन, तसेच शाळेतील व आंगणवाडीतील मुलांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. याचबरोबर खोपटे येथील शाळा व हायस्कूल यांना प्रत्येकी 21 खुर्च्यांचे वाटप करण्यात आले, तर कळंबुसरे येथील शाळेतील दोन वर्गांना रंगरंगोटी करून फॅन व डिजीटल बोर्ड लावलेल्या वर्गांचे उद्घाटन करण्यात आले, तसेच पिरकोन येथील महिला मंडळांना व सारडे गावातील महिला बचत गटांना रोजगारार्थ खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर चिरनेर आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना हॅपीस्कूल आंतर्गत संचवाटप करून आदिवासी दत्तक मुलांना स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले, तसेच आदिवासी मुलांना खेळाचे साहित्य व दप्तर बॅग देण्यात आल्या. शेवटी रानसई या उरणमधील दुर्गम आदिवासी शाळेत दप्तर बॅग व भांडी वाटप करण्यात आली. सामाजिक उपक्रमांना व राजू मुंबईकर यांना शुभेच्छा देण्यासाठी साई संस्था वहाळचे विश्वस्त रवीशेठ पाटील, माजी जि. प. सदस्य पार्वतीताई पाटील, माजी जि. प. सदस्य वैजनाथ ठाकूर, राजू मुंबईकर यांच्या पत्नी राणी मुंबईकर, सारडे विकास मंचचे आध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, छावा प्रतिष्ठान चिरनेरचे सुभाष कडू गोल्डन ज्युबलीचे अध्यक्ष आनिल गावंड, कॉनचे आध्यक्ष स्नेहल पालकर आदी उपस्थित होते.