रोहे ः प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीच्या दिशेने वारे वाहत आहेत. आता निवडणुकीचे रण पेटले असून त्याचा वणवा होईल. या वणव्यात सुनील तटकरे होरपळून जातील आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर निवडून येतील, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शनिवारी (दि. 12) येथे व्यक्त केला. शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या प्रचारार्थ रोह्यातील राम मारुती चौकात आयोजित सभेत गीते बोलत होते.
आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार अवधूत तटकरे, उमेदवार विनोद घोसाळकर, तसेच उस्मान रोहेकर, भाजप नेते संजय कोनकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी प्रास्ताविक केले. सभेस शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, शिवसेना शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, हेमंत देशमुख, नीता हजारे, समिक्षा बामणे, जयवंत पोकळे, मनोज शिंदे, वसंत शेलार, विष्णू लोखंडे, अनिश शिंदे, सुनील मुटके, यतीन धुमाळ, नितीन वारंगे, सचिन फुलारे, संतोष खेरटकर, महादेव साळवी, हर्षद साळवी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घराणेशाही मोडीत काढा -आमदार दरेकर
या वेळी आमदार प्रवीण दरेकर यांनीही सुनील तटकरेंवर टीका केली. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात तटकरेंनी आपल्या घराण्याभोवतीच राजकारण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही घराणेशाही मोडीत काढा, असे आवाहन आमदार दरेकर यांनी केले.
सरकारकडून आलेल्या सर्व योजना आपल्यापर्यंत 100 टक्के राबविणार आहे.
-विनोद घोसाळकर, महायुतीचे उमेदवार