Breaking News

पुरामुळे लोना कंपनीचे नुकसान

रसायनी ः पाताळगंगा नदीला आलेल्या पुराने लाडीवली जवळील लोना इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीमध्ये सुमारे सहा ते सात फूट पाणी होते. पाण्यामुळे कच्चा, तयार माल, विद्युत उपकरणे, मशिनरी पाण्याखाली गेल्या. यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर कंपनी केले आठ दिवस बंद होती, परिणामी उत्पादन झाले नाही. यात कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

चार लाखांची घरफोडी

पनवेल : बारवई येथील नीलेश बाबरे हे 8 ऑगस्ट रोजी खालापूर येथे गेले होते. ते घरी आले असता त्यांना त्यांच्या दरवाजाची कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत सापडला. चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोने, एलसीडी टीव्ही, व रोख रक्कम असा मिळून चार लाख 19 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला.

रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

पनवेल : तालुक्यातील पोयंजे गावाजवळ रेल्वेच्या इंजिनच्या धडकेत एकाचा मृत्यू  झाला आहे. तालुका पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. देवेन्द्र बागल (43, कुर्ला) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे.

12 वर्षीय मुलाचे अपहरण

पनवेल ः शुभम रमेश पाल हा आसूडगाव सेक्टर 4 येथील सफर सोसायटीत राहत असे. 5 ऑगस्ट रोजी त्याचे अपहरण करण्यात आले आहे. त्याची ऊंची 120 सेमी, अंगाने सडपातळ, चेहरा गोल, डोक्यावर केस वाढलेले, डोळे काळे व मोठे, पाठीवर जुन्या जखमांचे व्रण आहेत. 

नोकरीला लावतो सांगून फसवणूक

पनवेल : सिंगापूर येथील वेगवेगळ्या जहाजावर नोकरीला लावतो असे सांगून पैसे उकळणार्‍या तीन आरोपींना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. जीवन नंदकुमार गवळी (34, मोठा खांदा), सचिन गोरख देशमुख (25, कोपरखैरणे), रेवनसिद्ध पांडुरंग काळेल (21, कोपरखैरणे) अशी या तिघांची नावे आहेत.

महिलेचा विनयभंग

पनवेल ः 30 वर्षीय पीडित महिलेला एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून अश्लील व्हिडीओ व मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये भाषांतरीत मसेज पाठविले आहेत.

वीजचोरी उघड 

पनवेल : पेण येथील भरारी पथक वीजचोरी शोधून काढण्यासाठी बेलवली परिसरात रमेश नारायण शिर्के (वरिष्ठ तंत्रज्ञ) व संजीव नारायण खैरे (वरिष्ठ तंत्रज्ञ) यांच्यासोबत वीज मीटर तपासणीसाठी गेले होते. यावेळी मच्छिंद्र गंगाराम फडके (रा. बेलवली) यांनी एल. टी. लाईनवर हूक टाकून पुरवठा अनधिकृतपणे जोडून घेतलेला आढळून आला.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply