
पनवेल ः रामप्रहर वृत्त
शक्ती सन्मान महोत्सव उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी (दि. 9) खारघर येथे राखी पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा खारघर महिला मोर्चा सरचिटणीस बीना गोगरी यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात 104 महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्भावना राखी पाठवली.
राज्य शासनाच्या वतीने विविध शासकीय योजना राबविण्यात येतात. या उपक्रमांचा लाभ प्रामुख्याने अनेक महिलांना होत आहे. त्याअंतर्गत शासकीय योजनांचा लाभ झालेल्या महिलांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना राखी पर्वा अंतर्गत अनेक महिला राख्या पाठवत आहेत. भाजपा रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा कल्पना राऊत आणि पनवेल तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर येथील भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध जाती-धर्मांच्या व संघटनेच्या महिलांचा सहभाग लाभला. यात मुख्यत्वे संचयिनी महिला बचत गट, समृद्धी महिला बचत गट, जैन तेरापंथी महिला मंडळ, पतंजली योगपीठ, कर्नाटक संघ, स्वरतरंग वृंद, के. के. पी. महिला मंडळ, स्त्री शक्ती फाऊंडेशन आदी महिला संघटनांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे कार्यक्रमस्थळी हावरे दिव्यांग सेंटरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. उपस्थित महिलांनी दिव्यांग मुलांनी बनविलेल्या राख्या विकत घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठविल्याने या उपक्रमाला सामाजिक बांधिलकीचीही जोड लाभली. या वेळी पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, महिला मोर्चाच्या सरचिटणी बीना गोगरी, अंजू आर्या, स्मिता आचार्य, वैशाली प्रजापती, चांदनी अवघडे, अल्पना डे, हंसा पारधी त्याचप्रमाणे नर्मदाबेन चौटालिया, रेखा बावरी, पुष्पा गजरा, ममता गोयल, योगिनी गुंजाळ, माधुरी दाते यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या राखी पर्व संदर्भात महिला व बालकल्याण सभापती लीना गरड आणि महिला मोर्चाच्या खारघर शहर सरचिटणीस बीना गोगरी यांनी अधिक माहिती दिली आहे.