Breaking News

दिवेआगरजवळील डोंगराला वणवा

दुर्मीळ वनसंपदा खाक; वन्यजीवांनाही फटका

श्रीवर्धन : प्रतिनिधी

तालुक्यातील दिवेआगर-भरडखोल रस्त्याला लागून असलेल्या डोंगराला शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी वणवा लागला. त्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचे खूप मोठया प्रमाणावर नुकसान झाले.  दिवेआगर व आजुबाजुचा परिसर निसर्ग सौंदर्यााने नटलेला आहे. दिवेआगर-भरडखोल रस्त्याला लागून असलेल्या डोंगरावर  तर दुर्मिळ वनसंपदा असून व तेथे वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणावर  वावर आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास तेथे वणवा लागला.त्यात डोंगरावरील झाडे, झुडपे, औषधी वनस्पती जळून खाक झाली. तेथील वन्यजीवांनादेखील या वणव्याचा फटका बसला. दुर्मीळ वनसंपदा नष्ट झाली व शेकडो एकरचे हिरवेगार क्षेत्र भकास झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. हा वणवा लागला की, लावला गेला याबाबत या परिसरात उलटसुलट चर्चा असून, काही समाज कंटकांनी जाणूनबुजुण हे कृत्य केल्याचा संशय पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, दिवेआगरचे सरपंच उदय बापट यांनी घटनास्थळी  भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Check Also

पनवेल, उरणमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणार

महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 …

Leave a Reply