पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगर पलिकतेचे स्वछता निरीक्षक मनोज चव्हाण यांना 2019चा नवी मुंबई अचिव्हर्स पुरस्कार नुकताच मिळाला आहे. नवी मुंबई आवाज या वृत्त वाहिनीच्या वतीने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकत्याच झालेल्या शानदार कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, महापालिका आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. पनवेल नगरपरिषदेत तेरा वर्षांपूर्वी फायरमन म्हणून नोकरीस रुजू झालेले मनोज चव्हाण हे अतिशय धाडसी कर्मचारी म्हणून पनवेलने पहिले आहे. पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर त्यांची आरोग्य निरीक्षक म्हणून प्रभाग समिती ‘ब’मध्ये नेमणूक करण्यात आली. तिथेही ते कधी कामात कमी पडले नाहीत. नुकतीच त्यांच्या कामाची दाखल घेत पनवेल महानगर पालिकेने उत्कृष्ट स्वच्छता निरीक्षक म्हणून 15 ऑगस्ट रोजी महापौर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पडेल ती जबाबदारी, काम निष्ठेने ते करीत असत, शहराची स्वछता मोहीम असो की प्लास्टिक बंदी, अतिक्रमण कारवाई असो चव्हाण हे कधीही कंटाळले नाहीत, वरिष्ठ जे सांगतील ते काम प्रामाणिकपणे करीत असल्याने त्यांना नवी मुंबई आवाज या वृत्त वाहिनीने नवी मुंबई अचिव्हर्स हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची पोचपावती दिली.