Breaking News

घरात राहा, सुरक्षित राहा! -रजनी कोळी

उरण : वार्ताहर – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  उरण तालुक्यात  विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर उरण शहरातील नागरिकांनी घरात राहा, आणि सुरक्षित राहा, असे आवाहन उरण नगर परिषदेच्या आरोग्य सभापती तथा नगरसेविका रजनी सुनील कोळी यांनी नागरिकांना केले आहे.

तसेच रजनी कोळी पुढे म्हणाल्या की, उरण नगर परिषदेकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. उरण शहरात सर्वत्र स्वच्छता ठेवण्यात आली आहे. धुरांडी, कोट नाका येथे कोरोना निर्जंतुक कक्ष उभारणी करण्यात आली आहे. त्याचा वापर करा, उरण शहरात हायपोक्लोराईडची फवारणी करणे सुरु आहे. नागरिकांनी कामा शिवाय इतरत्र फिरू नये, मास्क चा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करावा स्वतःची, परिवाराची काळजी घ्या. (पुरेसे अंतर) सोशल डिस्टन्सिंग ठेवा. पोलीस यंत्रणा शासनाच्या सूचना दिल्या जात आहेत त्याचे पालन करा. त्यांना सहकार्य करा त्याचप्रमाणे नागरिकांनी नगरपरिषदेला सहकार्य करा नागरीकांचे आरोग्य चांगले राहावे या करिता नगरपरिषद विशेष लक्ष देत आहे, असे उरण नगर परिषदेचे आरोग्य सभापती रजनी सुनील कोळी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

त्याप्रमाणे उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,उरण शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी अधिकारी  विविध उपाययोजन करीत आहेत मेहनत करीत आहेत. नागरिकांनी उरण नगरपरिषदेला सहकार्य करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी  देशातील ,राज्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. त्याचे सर्वांनी पालन करून आपली सुरक्षा आपल्या हाती आहे. अशाप्रकारे जनजागृती करीत आहेत देशाला, राज्याला आपल्या जिल्ह्याला, आपल्या गावाला आपल्या शहराला सहकार्य करणे आहे आपले  कर्तव्य आहे, असेही रजनी कोळी म्हणाल्या.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply