Breaking News

ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात

नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त

ज्येष्ठ नागरिक संघ, नवीन पनवेल या संस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळा संघाच्या नवीन पनवेल येथील सभागृहात साजरा झाला. या कार्यक्रमाला पुणेे विद्यापीठातून वृद्धकल्याणशास्त्र विषयात डॉक्टरेट प्राप्त केलेल्या डॉ. रोहिणी पटवर्धन या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशनही झाले.

 वृद्धपणातील अखेरच्या टप्प्यातील आजारांवर किती प्रमाणात उपचार केले जावे, याचा विचार करून तसे वैद्यकीय इच्छापत्र (लिव्हिंग विल) आत्ताच करून ठेवावे त्यामुळे स्वतःला आणि मुलांनाही निर्णय घेताना त्रास होणार नाही, असा सल्ला डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी दिला. संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गेले वर्षभर विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अपोलो रुग्णालयाच्या सहकार्याने आरोग्य व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे अध्यक्ष बन्सीधर गैरोला, सचिव सुमित कुलकर्णी, खजिनदार प्रसाद वर्दम, प्रकाश पराडे, शोभा पराडे, अरविंद केळकर, चित्रा डे चौधरी, प्रकाश कुलकर्णी आदींनी मोलाचे योगदान दिले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply