Breaking News

वाशी येथे साहित्य जल्लोष

चिरनेर : वार्ताहर

आगरी साहित्य विकास मंडळ व जाणीव प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी नवी मुंबई येथे जल्लोष साहित्याचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. 26) गुरव ज्ञाती हॉलमध्ये सकाळी 10.00 ते 5.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला कवी, कथाकार हरिभाऊ घरत यांचे अध्यक्षपद लाभले होते. या वेळी रंगकर्मी विलास गुर्जर, उपसंचालक मंगेश विश्वासराव, श्रीकांत पाटील, कोकणरत्न पुंडलिक म्हात्रे, ज्येष्ठ साहित्यिका सुनंदा मोडखरकर, अ‍ॅड. चंद्रकांत मढवी, इतिहास संशोधक के. एम. मढवी, कवयित्री मीनल माळी, कवयित्री मनस्वी माळी, प्रा. चंद्रकांत पाटील, अ‍ॅड. दीनानाथ पाटील, मनोज म्हात्रे, कोकणरत्न रवीशेठ पाटील, डॉ. अशोक पाटील, जगन्नाथ जांभळे, स्तंभलेखक कैलास पिंगळे, डी.एल. पाटील, जनार्दन सोनखारकर, सदानंद ठाकूर, शिवाजी मोकल, सविता पाटील, संदीप पाटील, प्रकाश ठाकूर, रामनाथ म्हात्रे, हरिश्चंद्र माळी, भगवान ठाकूर, वीरेंद्र रत्ने आदी साहित्यिक मान्यवर उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री स्मिता वाजेकर यांनी चांगल्या पद्धतीने केले. नवी मुंबई, ठाणे, रायगड व मुंबई परिसरातील नवोदित कवी, लेखकांसाठी या साहित्य विचारांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख संयोजकांनी उपस्थित साहित्यिक मंडळींचे आभार व्यक्त केले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply