Breaking News

गव्हाण विद्यालयात शिक्षक-पालक संघाची स्थापना

पनवेल : रामप्रहर वृत्त

गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2019-20साठी पालक शिक्षक संघ व माता पालक संघाची स्थापना करण्यात आली.

विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सहविचार सभेत ही स्थापना करण्यात आली.सभेचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी केले.

या दोन्ही संघाच्या पदसिद्ध अध्यक्षा विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे असून माता पालक संघाच्या उपाध्यक्षपदी पालक सदस्या व गव्हाण ग्रामपंचायत सदस्या कामिनी प्रमोद कोळी यांची, तर सहसचिवपदी चित्रा रवींद्र भोईर यांची निवड झाली, तर सचिवपदी उपाध्यापिका जे. एच. माळी यांची निवड करण्यात आली. तसेच पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी पालक सदस्य शिवाजी भगत, तर सहसचिव चंद्रकांत म्हात्रे यांची, तर सचिवपदी उपाध्यापक देवेंद्र म्हात्रे यांची निवड करण्यात आली.

या वेळी स्थानिक शाळा समितीचे सदस्य विश्वनाथ कोळी, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रवींद्र भोईर, ज्यु. कॉलेज प्रमुख बी. पी. पाटोळे, रयत बँकेचे संचालक प्रमोद कोळी, चित्रा पाटील, कलाशिक्षक गणेश भोईर व अन्य रयत सेवक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले, तर प्रमोद कोळी यांनी आभार प्रदर्शन केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply