Breaking News

नॅपकिन बुके नववर्ष टेबल कॅलेंडरचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कामोठे येथील जननी ऑल इन स्टोअर दिग्दर्शित पर्यावरणपूरक नॅपकिन बुके नववर्ष टेबल कॅलेंडर तसेच बारा महिने-बारा सुविचार पोस्टरचे अनावरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या उपक्रमांचे कौतुक केले. अतिशय कल्पकतेने बनविलेला हा नॅपकिन बुके प्रत्येक घरात पोहचावा, असे सांगून त्यांनी या अनोख्या बुकेच्या प्रोप्रायटर मानसी गोरखनाथ पोळ हिस नववर्ष व बिझनेसवाढीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रकाशन समारंभास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुखर, माजी नगरसेवक तथा कामोठ्याच्या सुषमा पाटील विद्यालयाचे चेअरमन दिलीप पाटील कामोठे, सीईओ मंदार पनवेलकर, सुकापूर येथील ज्ञानेश्वर माऊली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनंता धरणेकर, जीवनदीप एड्युमीडिया प्रा.लि.चे मॅनेजरगोरखनाथ पोळ, संजय किसवे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply