Breaking News

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी
महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील भाजप महिला कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी (दि.11) माणगाव येथे झाली. या वेळी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत आपण सर्वांनी पोहचवल्या पाहिजेत, असे प्रतिपादन केले.
माणगावच्या सरलादेवी सभागृहात आयोजित या बैठकीस भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, रायगड लोकसभा निवडणूक प्रमुख सतिश धारप, जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, उपाध्यक्ष सोपान जांबेकर, महिला मोर्चा प्रदेश सचिव वर्षा डहाळे, यशोधरा गोडबोले, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष हेमा मानकर, सरचिटणीस गीता पालरेचा, सदस्य डॉ. मंजुषा कुद्रीमोती, प्राजक्ता शुक्ला, वैशाली मपारा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, नगरसेविका ममता थोरे, तालुकाध्यक्ष उमेश साटम, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष अश्विनी कडू, शहराध्यक्ष भारती शेट, दिप्ती नकाशे यांच्यासह माणगाव, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांतून महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेबांच्या रूपाने सक्षम नेतृत्व लाभले असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला खासदार सुनील तटकरेसाहेबांना निवडून द्यायचे आहे. तटकरेसाहेब राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असले तरी ते महायुतीचे उमेदवार असून निवडून आल्यावरही ते महायुतीचे खासदार म्हणून मतदारसंघात काम करतील. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात चांगले नेतृत्व आपल्या देशाला मिळाले आहे. त्यामुळे पुन्हा त्यांनाच आपल्याला पंतप्रधान पदावर बसविण्यासाठी आपल्या सर्वांना या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेऊन काम करावे लागणार आहे. निवडणुकीत महिलांची भूमिकाही महत्त्वाची आहे. महिलांनी महायुती सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवून आपल्या महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करण्यासाठी योगदान द्यावे.
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव वर्षा डहाळे यांनी रामराज्य या देशात नक्कीच येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला आहे, असे सांगून मोदीसाहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला खासदार सुनील तटकरे यांना प्रचंड मतांनी विजयी करायचे आहे. यासाठी सर्वांनी कामाला लागा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन सुरेखा दांडेकर यांनी केले.

महायुतीचे सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कटिबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर
आमदार प्रशांत ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले की, महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहे. या सरकारच्या माध्यमातून जनतेच्या हिताच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती घरोघरी पोहचवून आपल्या महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचे आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply