Breaking News

विसपुते अध्यापक महाविद्यालयाची स्नेहकुंज आधार घराला भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमधील प्रसिद्ध असलेल्या विसपुते अध्यापक महाविद्यालयाने वृद्धांसाठी मानवतेचा प्रयोग चालत असलेल्या स्नेहकुंज आधारगृह नेरे येथील आश्रमाला भेट दिली.

तेथील वृद्धांशी विद्यार्थ्यांनी गप्पा मारल्या. त्यांच्यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम केले. यात विविध गाण्यांवर नृत्य, नाट्यछटा इत्यादी करून वृद्धांचे मनोरंजन केले, तसेच वृद्धांसाठी एक एफएम रेडिओ भेट दिला. त्यानंतर धामणी येथील आदिवासी वाडीला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शेजारी असलेल्या गाढी नदीच्या पात्रातील पाण्याचा आनंद लुटला.

दुपारनंतर स्नेहकुंज आधारगृहाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. यशवंत बिड्ये यांनी शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व कसे असावे, याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विसपुते अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या कुसुम मधाळे यांनी केले. या वेळी स्नेहकुंज आधारगृहाच्या संचलिका संगीता जोशी, नितीन जोशी, यशकल्प फाऊंडेशनच्या अध्यक्षा यशश्री बिड्ये, कार्यकारी विश्वस्त यशवंत बिड्ये सर्व प्राध्यापक मंडळी व 115 अध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply