Breaking News

मोहोपाडा प्रिआ स्कूलचे हॉकीत सुयश

मोहोपाडा : प्रतिनिधी

राज्य क्रीडा व युवा संचालनालय आणि रायगड जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व हॉकी रायगड यांच्या सहकार्याने मोहोपाड्यातील प्रिआ स्कूल येथे शालेय हॉकी स्पर्धा व नेहरू कप हॉकी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत यजमान संघाच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले.

स्पर्धेत 14 वर्षांखालील गटात प्रिया स्कूलची मुले-मुली विजेते, तर 17 वर्षांखालील गटात मुली विजेत्या ठरल्या. त्याचप्रमाणे नेहरू कप हॉकी स्पर्धेत 15 वर्षांखालील गटात मुलांनी विजेतेपद, 17 वर्षांखालील गटात मुलांनी उपविजेतेपद, तर मुलींनी विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे संदीप वांजल उपस्थित होते. प्रिया स्कूच्या यशस्वी संघांना शाळेचे क्रीडा शिक्षक कैलास सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. हे सर्व संघ मुंबई विभाग स्तरावर रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रिआ स्कूल कमिटी, शाळेच्या मुख्याध्यापिका मधू शैलेंद्र, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply