Breaking News

कुस्ती स्पर्धेत ‘सीकेटी’चे उज्ज्वल यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत उज्ज्वल यश प्राप्त केले आहे.

नावडे येथील प. जो. म्हात्रे विद्यालयात झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या 14 वर्षांखालील मुलांच्या गटात सीकेटी विद्यालयाचे विद्यार्थी सिद्धेश तांडेल व गौरव मंडळ यांनी प्रथम क्रमांक, तर भावेश पाटील याने द्वितीय क्रमांक पटकाविला. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात सुजल म्हात्रे याने प्रथम व हर्ष गायकवाड याने द्वितीय क्रमांक मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षिका, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply