कर्जत ः बातमीदार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून माणगाववाडी आदिवासी आश्रमशाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. मधुरम चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय जनता पार्टी नेरळ, वैष्णव ट्रस्ट आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. नेरळ-माथेरान रस्त्यावरील माणगाववाडी आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद सुगवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मधुरम चॅरिटेबल ट्रस्टचे प्रकल्प अधिकारी माधव गायकवाड, सार्वजनिक रक्तदाते राजेश कोठारी, आश्रमशाळा मुख्याध्यापक नंदकुमार ईकारे, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील सार्वजनिक कार्यकर्त्या प्राची नायर, डॉ. दिव्या माचेकर, राजेश साळवी तसेच रक्तदान चळवळीतील कार्यकर्ते जयवंत म्हसे, प्रशांत सदावर्ते, कृष्णा जाधव, संजय ठाकरे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात आश्रमशाळेतील शिक्षक नितीन निकम यांनी सर्वात आधी रक्तदान केले. या वेळी रक्त संक्रमण करण्याचे काम डॉ. डी. वाय. पाटील रक्तपेढी विभागाने केले. डॉ. माचेवार, सहाय्यक राजेश पाटील, मनीषा दोरके, पूजा जगताप, शोभा वैती, नेहा घाडगे, फरिजा खान यांनी रक्त संक्रमण केले. 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती आयोजक माधव गायकवाड यांनी दिली.