Breaking News

रोह्यात राष्ट्रवादीला धक्का

वैभव चोरगे, उत्तम नाईक, नवनीत डोलकर भाजपमध्ये

रोहे : प्रतिनिधी

तटकरे कुटुंबीयांचे तीन पिढ्यांचे राजकीय सोबती असलेले कै. नामदेव चोरगे यांचे नातू, कै. प्रदीप चोरगे यांचे पुत्र व निडीतर्फे अष्टमी ग्रामपंचायतीचे सदस्य वैभव चोरगे, रोहे तालुक्यातील तडफदार नेते नवनीत डोलकर आणि युवा नेते उत्तम सीताराम नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप नेते राज पुरोहित, कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील, भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ, प्रवक्ते शायना एनसी यांच्यासह प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर आणि आमदार अवधूत तटकरे यांच्या शिवसेना प्रवेशाची घटना ताजी असतानाच वैभव चोरगे, नवनीत डोलकर व उत्तम नाईक यांच्या प्रवेशाने रोह्यात राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. रोह्यात नाईक व डोलकर ही जोडगोळी मसलपॉवर म्हणून ओळखली जाते, तर चोरगे हे निडी तर्फे अष्टमी ग्रामपंचायतीचे सदस्य असून, त्यांच्या मातोश्री प्रमिला चोरगे माजी जिल्हा परिषद सदस्या आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply