Breaking News

कर्जतमध्ये दुकान फोडले

सव्वा लाखाचा ऐवज चोरला

कर्जत ः प्रतिनिधी

मागील वर्षभरापासून कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात चोर्‍या, घरफोड्या होत असून शनिवारी पुन्हा एकदा कर्जत पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भरवस्तीतील आशापुरा मोबाइल आणि घड्याळ विक्रीचे दुकान चोरट्यांनी फोडून  मोबाइल, मनगटी घड्याळे आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 30 हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला. चंद्रकांत मांडे यांनी आपला दुकान गाळा वीरराम पुरोहित यांना भाड्याने दिला आहे. त्यांनी त्या गाळ्यामध्ये आशापुरा नावाने मोबाइल विक्रीचे दुकान सुरू केले आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यास आले असता त्यांना दुकान चोरट्यांनी फोडल्याचे लक्षात आले. दुकानामधील सहा मोबाइल, 13 घड्याळे, लॅपटॉप तसेच रोख रक्कम गायब होती. सदर चोरट्यांचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात झाले आहे. त्यामध्ये 22 ते  23 वर्षांचे युवक दिसत आहेत. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पीएसआय सचिन गावडे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक आणि व्यापारीवर्गात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाढत्या चोरी, घरफोडीच्या घटनांवर पोलिसांना अंकुश लावण्यात अपयश आले आहे. अनेक वेळा सीसीटीव्हीत चोरट्यांचे चित्रीकरण सापडूनही पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागत नाही ही खेदाची बाब आहे.

-चंद्रकांत मांडे, सदस्य ज्येष्ठ नागरिक संघटना

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply