महाड : प्रतिनिधी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मंगळवारी (दि. 9) श्रीवर्धनच्या दौर्यावर येत आहेत. निर्सग चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्याला बसला असून, श्रीवर्धन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असल्याने या मतदारसंघाची पाहणी करण्यासाठी दरेकर येत आहेत. या दौर्यात आमदार भाई गिरकर, आमदार प्रसाद लाड, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी हेही असणार आहेत.
श्रीवर्धन मतदारसंघ दौर्याची सुरुवात सकाळी 10 वाजता मोरबा येथील वादळग्रस्त गावांची पाहणी करून करण्यात येईल. त्यानंतर 11.30 वा. म्हसळा येथे पाहणी केली जाणार आहे. दुपारी 12.30 वा. श्रीवर्धनमधील अन्य गावांचा पाहणी करून 1.30 वा. श्रीवर्धन प्रांत-तहसीलदार कार्यालयात महसूल, पोलीस, कृषी, वैद्यकीय, विद्युत वितरण, ग्रामविकास अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, तर सायंकाळी 4 वा. जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या वादळग्रस्त गावांची पाहणी करण्यात येणार आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …