Breaking News

माजी मंत्री प्रभाकर मोरे यांना अखेरचा निरोप

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

महाड ः प्रतिनिधी

शिवसेना नेते व माजी ग्रामविकास तथा गृहराज्यमंत्री कै. प्रभाकर (भाऊ) मोरे यांच्यावर रविवारी (दि. 15) महाडच्या वैकुंठ स्मशानभूमीत हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप देत अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी कै. प्रभाकर मोरे यांच्या निवासस्थानी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी भेट देत मोरे यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले, तर शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून आमदार भरत  गोगावले, महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी श्रध्दांजली अर्पण केली. या वेळी पोलिसांच्या वतीने स्व. मोरे यांना मानवंदना देण्यात आली.  महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. ामदार भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, राजिप सदस्य जितेंद्र सावंत, भाजप उपजिल्हाध्यक्ष राजेय भोसले, भाजपचे तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाड विधानसभा अध्यक्ष सुभाष निकम, किशोर जैन, प्रमोद घोसाळकर आदी मान्यवरांनी भाऊंचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. अंत्ययात्रा महाडच्या वैकुंठभूमीत पोचल्यानंतर महाडचे आमदार भरत गोगावले, किशोर धारिया, प्रकाश दरेकर, बिपीन महामुणकर, राजिप सदस्य चंद्रकात कळंबे, नगरसेवक संदीप जाधव, संजय भुस्कुटे, यांनी भाऊंच्या आठवणींना उजाळा दिला.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply