Breaking News

जनहित संवर्धक मंडळाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर नवीन पनवेलमधील जनहित संवर्धक मंडळाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

नवीन पनवेलमधील जनहित संवर्धक मंडळाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुहास हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जनहित संवर्धक मंडळाचे अध्यक्ष सुहास सहस्रबुद्धे, पनवेल शहर संघचालक प्रशांत कोळी, माजी विभाग संघचालक यशवंत पाटील, पनवेल माहापालिका उपमहापौर विक्रांत पाटील, नगरसेवक संतोष शेट्टी, नितिन पाटील, विस्तारक अविनाश कोळी आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply