Breaking News

रेवदंडा व बोर्लीमध्ये पोलिसांचे पथ संचलन

रेवदंडा : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रेवदंडा पोलिसांनी शनिवारी (दि. 12) सायंकाळी रेवदंडा, चौल व बोर्ली या ठिकाणी  पथ संचलन केले. रेवदंडा पोलिसांनी प्रथम चौल नाका येथे पथ संचलन केले. तेथून रेवदंडा बाजारपेठेत पथ संलचन करण्यात आले. चौल व रेवदंडा येथील पथ संचलनानंतर बोर्ली आऊटपोस्ट पोलीस ठाणे ते बोर्ली गाव व बोर्ली नाका या मार्गावर पोलिसांनी पथ संचलन केले. अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या पथ संचलनात रेवदंडा पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्यासह पोलीस कर्मचारी, होमगार्डच्या जवानांनी सहभाग घेतला होता.

विधानसभा निवडणुकीदरम्यान रेवदंडा पोलीस ठाण्यात अतिरिक्त कर्मचारी रूजू होतील, तसेच विधानसभा निवडणूक कायदा व सुव्यवस्थेच्या अधीन राहून शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल निश्चितपणे योगदान देईल.

-सुनील जैतापूरकर, निरीक्षक, रेवदंडा पोलीस ठाणे

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply