कर्जत : बातमीदार
कर्जत विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या नेरळ गावातील प्रचारफेरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. शिवसेना, भाजप, आरपीआय (आठवले गट) आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पायी प्रचारफेरीत सहभागी झाले होते. कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील दिव्यादीप हॉटेल येथून महेंद्र थोरवे यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. खांडा भागातून ही प्रचारफेरी नेरळ टॅक्सी स्टॅण्ड, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जुन्या बाजारपेठेतील भाजप कार्यालयात पोहचली. तेथे भाजप महिला कार्यकर्त्यांनी औक्षण केल्यानंतर ही प्रचारफेरी टिळक वाचनालय मार्गे हुतात्मा हिराजी पाटील चौकातून पाडा भागात पोहचली. प्रचारफेरीदरम्यान उमेदवार महेंद्र थोरवे यांनी व्यापार्यांशी चर्चा केली. काही व्यापारी स्वतःहून दुकानाबाहेर येऊन थोरवे यांना शुभेच्छादेखील देत होते. भाजप नेते पुंडलिक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, शहर अध्यक्ष अनिल जैन, शिवसेना जिल्हा सल्लागार भरत भगत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सावळाराम जाधव, आरपीआय तालुका अध्यक्ष राहुल डाळिंबकर, शहर अध्यक्ष बाळा संदनशिव, नेरळच्या सरपंच जान्हवी साळुंखे, नियोजित सरपंच रावजी शिंगवा, शिवसेनेचे शहरप्रमुख रोहिदास मोरे, उपतालुकाप्रमुख अंकुश दाभणे, अमर मिसाळ, विश्वजित नाथ, बाळाजी विचारे, भगवान चव्हाण, सुरेश गोमारे, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष समिधा टिल्लू, तालुका अध्यक्ष सुनंदा जाधव, युवा सेनेचे पदाधिकारी संदीप बडेकर, प्रथमेश मोरे, नेरळ ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर, प्रथमेश मोरे, केतन पोतदार, सदानंद शिंगवा, राजेश मिरकुटे, मीना पवार, नियोजित सदस्य श्रद्धा कराळे, शारदा साळेकर, जयश्री मानकामे, शिवाली पोतदार, उमा खडे, शिवसेना शहर संपर्क प्रमुख किसन शिंदे, गीतांजली देशमुख, राजन लोभी, उपशहरप्रमुख बंडू क्षीरसागर, विभागप्रमुख प्रभाकर देशमुख आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या प्रचारफेरीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.