पेण : प्रतिनिधी
भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी रावे (ता. पेण) गावात भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, पेण नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक निवृत्ती पाटील, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, आदिनाथ पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येऊन येऊन येणार कोण, रविशेठ पाटील यांच्याशिवाय हायच कोण, भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचा विजय असो, अशा घोषणा देत ही रॅली संपूर्ण रावे गावात सर्व आळींमधून फिरवण्यात आली. तरुण कार्यकर्त्यांबरोबर ज्येष्ठ नागरिक, महिला, तसेच लहान मुलांनीही मोठ्या संख्येने या रॅलीत सहभाग घेतला होता. येत्या 24 तारखेला पेणच्या रवीकिरणांचा प्रकाश राज्याच्या विधिमंडळात नक्कीच पोहचेल, असा आत्मविश्वास भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी या वेळी व्यक्त केला.