Breaking News

विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हा!

माजी जि. प. सदस्या कौसल्या पाटील यांचे आवाहन

पेण : प्रतिनिधी

विरोधी पक्षाच्या आडमुठ्या धोरणामुळे खारेपाट भागाचा विकास खुंटला असून, या भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी रविशेठ पाटील यांच्या रूपाने संधी चालून आली आहे. या संधीचे सोने करून घ्या, असे आवाहन माजी जि. प. सदस्या कौसल्या पाटील यांनी केले. भाजप-शिवसेना-आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या खारेपाट भागातील प्रचारात त्यांची पत्नी माजी जि. प. सदस्या कौसल्याताई पाटील व स्नुषा नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी आघाडी घेतली आहे. पेण खारेपाट भागातील मसद, मसदबेडी, सागरवाडी, दरबारवाडी, आंबावाडी, शिर्की चाळ, सरेभाग, बोरी या भागात महिला कार्यकर्त्यांसह या वेळी प्रचार करण्यात आला. या वेळी कौसल्याताई पाटील यांनी महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांना आपले मत देऊन विकासाच्या प्रवाहात सामील व्हा व आपला व आपल्या भागाचा विकास साधा, असे आवाहन केले. या वेळी पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रचार दौर्‍यात भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षा प्रचिता पाटील, कल्याणी पाटील, धनश्री पाटील, शुभांगी पाटील, वृषाली पाटील आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply