रायगड हॉस्पिटलकडून विद्यार्थ्यांची तपासणी आरोग्य शिबीर; 84 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
कर्जत : बातमीदार
विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या पथकाने 86विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. या वेळी आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांवर डिकसळ येथील रायगड हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रायगड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. मंडळाचे कोषाध्यक्ष विवेक पोतदार यांच्या हस्ते फित कापून या शिबिराची सुरुवात करण्यात आली. रायगड हॉस्पिटलचे डॉ. सचिन डोरे, डॉ. निलेश साळवे, डॉ. सबिहा इनामदार, नेत्र चिकित्सक ओंकार पोटे यांनी 80 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. त्यांना परिचारिका दिव्या डाकी, सहाय्यक सुनील रसाळ यांनी सहकार्य केले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. नंदकुमार इंगळे उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. सोनम गुप्ता, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अनंत घरत, प्रा. सागर मोहिते, समाधान पाटील, संतोष तुरुकमाने, स्नेहल देशमुख, अमोल सोनावणे, विकास घारे, वैभव बोराडे, धनंजय कोटांगळे, ग्रंथपाल जागृती घारे, आरती आवटे, दीपक जोशी यांच्यासह सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.