Breaking News

आमदार मंदाताई म्हात्रे यांची मिनी सी-शोरला भेट

पुन्हा निवडून दिल्याबद्दल नागरिकांचे मानले आभार

नवी मुंबई : प्रतिनिधी

बेलापूर मतदारसंघामध्ये वाशी, सानपाडा, नेरूळ, सीबीडी येथे मॉर्निंग वॉककरिता येणार्‍या ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांची बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे सातत्याने भेट घेऊन त्यांच्या समस्या व मागण्या ऐकत असत. आता पुन्हा आमदारपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आज सकाळी वाशी येथील मिनी सी-शोर येथे मॉर्निंग वॉककरिता येणार्‍या सर्व महिला व ज्येष्ठ नागरिक यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले, तसेच त्यांच्याबरोबर संवाद साधला. या वेळी माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे, परिवहन सदस्य राजू शिंदे, मारुती भोईर, विकास सोरटे, विक्रम पराजुली, उदयवीर सिंग, अब्दुल हमीद खान (पाशाभाई), तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या वेळी काही ज्येष्ठांनी आम्ही आजपर्यंत सांगितलेल्या सर्व समस्या आपण मार्गी लावल्या आहेत. त्यामुळे आपणच आम्हाला आमदार हव्या असल्याचे मत व्यक्त करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, वाशी, सानपाडा, नेरूळ व सीबीडी येथील मॉर्निंग वॉकला येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा देण्याकरिता, तसेच त्यांच्या समस्या व मागण्या ऐकण्याकरिता मी त्यांची भेट घेत असते. हा स्तुत्यक्रम गेली अनेक वर्षापासून सुरू आहे. मी पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून येण्यामागे माझ्या मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचा सिंहाचा वाटा आहे. आज त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानण्याकरिता मी येथे आलेले आहे. त्यांचे आभार मानतानाही त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून समाधान वाटत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न असतात, परंतु ते कधीही कथन करीत नाहीत. त्यांना खरी आधाराची गरज आहे. कारण ते कोणावर ओझे नसून ती आपल्या देशाची राष्ट्राची खरी संपत्ती आहे. अशा ज्येष्ठांनीच मला मोलाची साथ दिल्यामुळे मी आज बेलापूर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करीत असल्याचे मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त करत माझीही ज्येष्ठ नागरिक होण्याकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे सांगताच ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गाने हसून दाद दिली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply